ऑनलाईन लॉटरी

"अर्ज करणे अगदी सोपे पारदर्शकतेची खात्री
ऑनलाईन लॉटरीशी आता सहज जुळते मैत्री"

 

ऑटो परवाना

ऑटो रिक्षा परवान्यांच्या वितरणासाठी राज्यात प्रथमच अंधेरी येथील प्रादेशिक वाहतूक कार्यालयात 27 फेब्रुवारी 2014 रोजी ऑनलाईन लॉटरीचे आयोजन करण्यात आले.

या लॉटरीमध्ये, मुंबई, वसई, अहमदनगर, अकलूज, अकोला, अमरावती, औरंगाबाद, अंबाजोगाई, बारामती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कल्याण, कराड, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पनवेल, परभणी, पेण-रायगड, पिंपरी-चिंचवड, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे प्रादेशिक वाहतूक कार्यालयांचा समावेश होता.

लॉटरीचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद आणि नागपूर मधील पहिल्या दोन विजेत्यांची नावे घोषित केली. या लॉटरीसाठी राज्यभरातून 69000 अर्जदार निवडले गेले. त्यात मुंबई महानगरातील 33000 अर्जदारांचा समावेश होता.

या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महाऑनलाईनतर्फे हेल्पलाईनची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली.