ऑनलाईन प्रवेश

"शिक्षण प्राप्त करणे आता अवघ्या एका क्लिकवर
ज्ञानप्राप्तीचा लाभ घ्या आता सहज, निरंतर"

 

2012-2013 या शैक्षणिक वर्षापासून महाऑनलाईनने मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि मुक्त शिक्षण संस्थेसाठी ऑनलाईन प्रवेश यंत्रणा विकसीत केली. या यंत्रणेमार्फत विद्यार्थी इंटरनेटच्या साहाय्याने कोठुनही या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात.

मुबई विद्यापीठासाठी महाऑनलाईनमार्फत पुढील सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

उमेदवार नोंदणी :-

 • ऑनलाईन नोंदणी
 • ईमेल पडताळणी आधारीत अधिप्रमाणन
 • पीआरएन मार्फत स्वयंचलितरित्या ईमेल आयडी प्राप्त
 • एसएमएस इंटिग्रेशन

प्रवेश :-

 • विविध अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज
 • स्कॅन केलेली आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे
 • पेमेट गेटवे/बँक चलानद्वारे शुल्क भरणा
 • एसएमएस/ई-मेल द्वारे अर्जदाराला सूचित करणे
 • आवेदन अर्जात बदल करण्याची सुविधा
 • पात्रता आणि शिष्यवृत्ती अर्जांना ऑनलाईन मंजुरी
 • शेवटच्या दिवशी ॲप्लिकेशन आपोआप बंद
 • शैक्षणिक अर्हतेमध्ये निकालाचा समावेश