ई-केवायसी

"ग्राहकांना जाणून घ्यायची सहज सोपी प्रक्रिया
एका क्लिकवर सारे तपशील क्षणात प्राप्त करू या"

 

सेवा प्रदान करण्याच्या कामी केवायसी ही एक मूलभूत प्रक्रिया आहे, ज्याद्वारे अर्जदाराची ओळख तसेच त्याचा पत्ता आणि जन्मतारीख, लिंग यांसारखे तपशील प्रस्थापित होतात. स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी, शिष्यवृत्ती, कर्ज, सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन, मोबाइल जोडणी अशा सेवा प्रदान करण्यासाठीची पात्रता निर्धारित करताना केवायसीद्वारे प्राप्त तपशिलांची सांगड घातली जाते.

ई-केवायसी सेवेद्वारे जन्मतारीख, लिंग याचबरोबर पत्त्याचा पुरावा, ओळखीचा इलेक्ट्रॉनिक पुरावा असे तपशील तात्काळ प्राप्त होतात. त्याचबरोबर सेवा प्रदात्याला अर्जदाराचा मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ताही प्राप्त होतो, ज्यामुळे सेवा प्रदान करण्याच्या प्रक्रियेतील अनेक अडचणी दूर होतात. एखाद्या सेवा केंद्रातील बायोमेट्रिक अधिप्रमाणनाचा वापर करून किंवा संकेतस्थळ अथवा मोबाईल जोडणीचा वापर करून ई-केवायसी ची पूर्तता करता येते.

महाऑनलाईनने खालील नागरिक केंद्रित सेवांसाठी केवायसी प्रक्रिया लागू केली आहे:

  • नावात बदलाची प्रसिद्धी
  • धर्मात बदलाची प्रसिद्धी
  • जन्मतारखेत बदलाची प्रसिद्धी

आधार कार्ड धारक नागरिक संबंधित बायो-मेट्रिक प्रणालीला स्वत:च्या अंगठ्याचा ठसा सादर करून स्वत:च्या ई-केवायसी चा तपशील सादर करू शकतो आणि आवश्यक सेवा प्राप्त करण्यासाठीच्या अर्जातील तपशिलाची नोंद केंद्र चालकामार्फत करू शकतो.