एसएमएस गेटवे

"उपयुक्त माहिती ग्राहकापर्यंत पोहोचते क्षणात थेट
एस एम एसच्या माध्यमातून तपशिलाची अनोखी भेट"

 

नागरिक अथवा व्यावसायिकांना महत्वपूर्ण सूचना अथवा ताज्या घडामोडींची माहिती देणारे एसएमएस पाठविण्यासाठी शासकीय विभाग आणि संस्था एसएमएस गेटवे या यंत्रणेचा वापर करतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी महाऑनलाईन मोबाईल सेवेत संबंधित विभाग/संस्थेचे खाते असणे आवश्यक आहे. ही सेवा केवळ महाराष्ट्र राज्यातील शासकीय विभाग आणि संस्थांसाठी उपलब्ध आहे.

आजघडीला साखर आयुक्तालय, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, सार्वजनिक आरोग्य, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्रम, शालेय आरोग्य कार्यक्रम तसेच वॉटर ट्रॅकींग ट्रॅकर सिस्टम सारखे विभाग एसएमएस गेटवेचा वापर करीत आहेत.

दैनंदिन तत्वावर कारखान्यांमधून माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. याअंतर्गत साखर कारखान्यांमार्फत एका सुनिश्चित स्वरूपात निश्चित शॉर्ट कोडवर विविध मापदंडांचा समावेश असणारा एसएमएस पाठविला जातो. डेटाबेस मध्ये या माहितीची नोंद घेतली जाते आणि एमआयएस अहवाल जारी केला जातो.

एसएमएस सेवेचे मुख्य लाभ

  1. विविध स्वरूपातील दैनंदिन आणि अद्ययावत गाळप आणि साखर उत्पादनाचे संकलित अहवाल कमी वेळेत उपलब्ध
  2. कारखान्यामधून माहिती प्राप्त करण्यास लागणाऱ्या श्रमांची बचत
  3. किमान मानवी हस्तक्षेप, मोजणी विरहित असल्यामुळे दोषमुक्त संचलनाची ग्वाही
  4. अहवाल तात्काळ संकेतस्थळावर उपलब्ध आणि इंटरनेटद्वारे कोठूनही पाहणे शक्य.
  5. देशांतर्गत मागणी लक्षात घेत साखर उत्पादनाचे विश्लेषण करण्याच्या कामी सरकारला सहाय्यकारक.