संकेतस्थळ विकसन

"संकेतस्थळे विकसीत करण्यात आम्हाला साध्य कुशलता
व्यवस्थापन, मार्गदर्शन सारे प्राप्त सहजता"

 

महाऑनलाईनमध्ये आम्ही संकेतस्थळे आणि वेब ॲप्लिकेशन्स विकसित करतो आणि त्यांचे व्यवस्थापन करतो. आकर्षक आणि सुंदर वेबसाईट तयार करतानाच त्या हाताळण्यास सोप्या आणि योग्य तो परिणाम साधण्याच्या दृष्टीने सक्षम असतील याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी आमचे तंत्रकुशल आणि मेहनती मनुष्यबळ सदैव सज्ज असते. आमच्या समाधानी ग्राहकांवर आणि आम्ही केलेल्या कामावर एखादा दृष्टीक्षेप टाकला तरी आमच्या यशस्वी कामाची खात्री अगदी सहज पटेल. संकेतस्थळ संरचना आणि विकसनाच्या क्षेत्रात महाऑनलाईनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संकेतस्थळ संरचना, संकेतस्थळ विकसन, संकेतस्थळ फेररचना, सीएमएस,ई-कॉमर्स, वेब ॲप्लिकेशन आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे आम्ही विकसित केली आहेत. या वेब सेवांव्यतिरिक्त संबंधित विभागांना आपापली संकेतस्थळे अद्ययावत राखता यावीत यासाठी विभागीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि सहाय्य दिले आहे. आपल्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ विकसीत करण्याबरोबरच ते अद्ययावत राखण्याची पुरेपूर काळजीसुद्धा आम्ही घेतो.

मुख्य वैशिष्ट्ये :

  • सीएमएस बेस वेब पोर्टल्स
  • जीआयजीडब्ल्यू, डब्ल्यूसीएजी 2.0 अशा मातंसं साठी आवश्यक सर्व मानकांची पूर्तता
  • सर्व प्रकारच्या डिव्हाईसना सपोर्ट करणारी प्रतिसादक्षम वेब पोर्टल्स
  • एचटीएमएल 5, सीएसएस 3 सारखी अद्ययावत कोडिंग मानके.
  • ब्राऊजर कम्पॅटिबल