जीआयएस

"उपलब्ध माहितीचे सूत्रबद्ध संकलन
जीआयएसचे दुसरे नाव दर्जेदार विश्लेषण"

 

जीआयएस काय आहे?

जीआयएस हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उपकरणांनी परिपूर्ण असे तंत्रज्ञान आहे. माहिती हाताळणारे ते एक कार्यक्षम धोरण आहे. आवश्यक असलेले तपशील एका दृष्टीक्षेपात सादर करणे आणि समग्र निर्णय प्रक्रिया प्रभावी करणे, हा जीआयएसचा मुख्य उद्देश आहे.

जीआयएस विशेष का आहे?

जीआयएस ही उपलब्ध माहिती योग्य प्रकारे हाताळणारी उपयुक्त यंत्रणा आहे. स्थानाच्या आधारे संबंधित माहितीचा संदर्भ निश्चित केला जातो. अवकाश सान्नीध्यावर आधारित कृतींचा परस्पर संबंध निश्चित करण्याचे काम ही यंत्रणा करते.

जीआयएसचे फायदे

  • माहितीचे सुव्यवस्थापन
  • दर्जेदार विश्लेषण
  • संभाव्य शक्यतांची पडताळणी शक्य
  • प्रकल्प कार्यक्षमतेत सुधारणा 

जीआयएस ॲप्लीकेशन्स

  • सुविधा व्यवस्थापन
  • मार्केटिंग आणि रिटेलिंग
  • पर्यावरण
  • वाहतूक/वाहन मार्ग
  • आरोग्य
  • विमा