पेमेंट गेटवे

"रोख रक्कम बाळगण्याची धास्ती नाही आता
शुल्क भरणा सोपे झाले पेमेंट गेटवे येता"

 

महाऑनलाईन पेमेंट गेटवे खालील काही प्रकारांतील ई-सेवांसाठीची देयके प्राधिकृत करण्यासाठी ई-कॉमर्स सेवा एपीआय म्हणून कार्यरत आहे. :-

  • बिझनेस टू बिझनेस (बी टू बी)
  • बिझनेस टू सिटीझन (बी टू सी)
  • गव्हर्नमेंट टू सिटीझन (जी टू सी)
  • गव्हर्नमेंट टू बिझनेस (जी टू बी)

याद्वारे पुढील पद्धतीने देयके स्वीकारली जातात -

  • क्रेडिट कार्ड
  • नेट बँकींग
  • डेबिट कार्डस्

ठळक वैशिष्ट्ये

  • प्रत्येक व्यवहार आणि मध्यवर्ती माहिती डेटाबेससाठी प्रमाणीकरण, अधिकृतता आणि लेखापरिक्षण या तपशिलांची साठवण केली जाते.
  • साधा आणि वापरण्यास सोपा जीयुआय (इंटरफेस)
  • ॲप्लिकेशन प्रक्रिया समजून घेण्यास सोपी.
  • व्यवहार पूर्ण करण्यासाठी यंत्रणा केवळ दोन सेकंदाचा अवधी घेते.
  • कार्ड नंबर, पिन कोड आणि इतर माहिती नेटवर पुरवताना संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेसाठी एसएसएल (सिक्युअर सॉकेट लेअर) एनक्रिप्शनचा वापर
  • एसएमएस गेटवे एकीकरण
  • जावा, जेएसपी, एएसपी, डॉट नेट, पर्ल, पीएचपी आणि इतर बहुतेक तंत्रज्ञानांना सहाय्यक
  • वेब सेवा सुविधा - व्यवहार सलोखा प्रक्रिया
  • एमआयएस अहवाल निर्मिती - विभागाच्या गरजेनुसार
  • स्वयंचलित पोच पावती निर्मिती