यशोगाथा

"विज्ञान आणि तंत्रज्ञानाला बुद्धीमत्तेची मिळता साथ
नवी दालने यशस्वितेची खुली जाहली जल्लोषात..."

 
 

सुवर्ण पदक

एक्सलन्स इन सीटीझन सेंट्रीक सर्व्हीस डिलीव्हरी

इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी
आयसीटी सेल, म्हाडा साठी मॅनेजमेंट सिस्टम  

 

सुवर्ण पदक

सर्वोत्कृष्ट संकेतस्थळ/ पोर्टल

महान्यूज वेब पोर्टल -
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय 

 

रजत पदक

सर्वोत्कृष्ट संकेतस्थळ/ पोर्टल

मराठी भाषा विभाग
मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळासाठी 

 

रजत पदक

प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर

साखर आयुक्तालय, सहकार विभाग
( साखर कारखान्यांतील दैनंदिन ऊस गाळप आणि साखर
उत्पादन याचा तपशील प्राप्त करण्यासाठी पुल एसएमएस गेटवे चा वापर) 

 

कांस्य पदक

सर्वोत्कृष्ट संकेतस्थळ/ पोर्टल

साखर आयुक्तालय, सहकार विभाग
महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तालयाचे वेब पोर्टल

 

कांस्य पदक

एक्सलन्स इन सीटीझन सेंट्रीक सर्व्हीस डिलीव्हरी

पंचायत राज आणि ग्राम विकास विभाग, संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) साठी

सॉफ्टवेअर फॉर असेसमेंट ऑफ डिसएबिलिटी (एसएडीएम)

परिचय : राज्यातील नागरिकांमधील अपंगत्वाच्या टक्केवारीचा आढावा घेणे आणि "अपंगत्व प्रमाणपत्र" जारी करण्यासाठी राज्यातील विविध रूग्णालये आणि आरोग्य संस्थांना वापरता येईल, असे हे ॲप्लिकेशन सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत करण्यात आले.

कामगिरी

  • राज्य ई-प्रशासन पुरस्कार 2013 - एसएडीएम ला ई- प्रशासन उत्कृष्टतेसाठीचा कांस्य पुरस्कार प्राप्त
  • राज्य ई-प्रशासन पुरस्कार 2013 - प्रशासनात माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापरासाठीचा कांस्य पुरस्कार प्राप्त
  • स्कॉच स्मार्ट गव्हर्नन्स 2014 - स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट

आकडेवारी

  • एकूण अर्जदार - 151640
  • जारी केलेली एकूण "अपंगत्व प्रमाणपत्रे" - 108116
  • एकूण नामंजूर प्रकरणे - 21529
  • मूल्यमापन करावयाचे एकूण अर्ज - 22542
  • मूल्यमापन झालेले एकूण अर्ज (%) - 85
सार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ

परिचय : हे संकेतस्थळ सार्वजनिक आरोग्य विभागाचे विविध आरोग्य कार्यक्रम, आरोग्य सेवा, नवीन उपक्रम आणि इतर विविध प्रकल्पांची माहिती देते. याद्वारे नागरिक आपले अभिप्राय सादर करू शकतात तसेच संबंधित माहितीचा अधिकार, आसन निर्णय आणि परिपत्रकेही पाहू शकतात.

कामगिरी

  • महाराष्ट्र हेल्थकेअर लिडरशीप समीट ॲन्ड अवार्डस् 2014 विजेता - वर्षातील सर्वोत्कृष्ट संकेतस्थळ
  • राज्य ई-प्रशसन पुरस्कार 2014 - - रजत पदक - सर्वोत्कृष्ट संकेतस्थळ/पोर्टल
डिजीटल सर्व्हीस बुक (एचआरएमएस - मंत्रालय)

परिचय :  महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नोंदी, त्यांची विद्यमान पदनियुक्ती आणि त्यांच्या विभागांतर्गत बदल्या (बदली, पदोन्नती, प्रतिनियुक्ती इ. ) याबाबतचे तपशील हे ॲप्लिकेशन प्राप्त करते.

वापरकर्त्यांची संख्या : 6095

गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)

 परिचय:सोनोग्राफी प्रक्रियांची संख्या आणि तपशील तसेच सोनोग्राफी केंद्रे आणि सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांचा तपशील याबाबत अद्ययावत माहितीची नोंद ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील विविध रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये या ॲप्लिकेशनचा वापर केला जातो.

कामगिरी

  • यंत्रणेत नोंदणी असलेल्या केंद्रांची एकूण संख्या - 7343
  • एफ अर्ज ऑनलाईन भरणाऱ्या केंद्रांची एकूण संख्या - 4739
  • एफ अर्ज ऑनलाईन भरणाऱ्या केंद्रांची टक्केवारी - 64%
  • आजतागायत सादर करण्यात आलेल्या एफ अर्जांची संख्या - 7833553
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2014

परिचय : कॉन्स्टेबल आणि बँड्समॅन पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठीची ही एक परिपूर्ण नागरिक केंद्रित यंत्रणा आहे.

युजरची नोंदणी, आवेदन अर्ज, शुल्क भरणेनंतर अर्ज रद्द करणे अशा वैशिष्ट्यांमुळे ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद, साधी आणि वापरण्यास सोपी ठरली.

महापोलीस या वेब पोर्टलवर वैध ई-मेल आयडीसह उमेदवार नोंदणी करतात. नोंदणीनंतर इच्छुक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार नोंदणी केलेल्या ईमेल आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करतात. यंत्रणेमध्ये प्रत्येक पदासाठी विशिष्ट निकष ( शिक्षण, किमान आणि कमाल वयोमर्यादा) लागू आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगपैकी पसंतीचा पर्याय निवडून उमेदवार ऑनलाईन शुल्क भरणा करू शकतो. ऑफलाईन शुल्क भरणा करावयाची असल्यास उमेदवार एसबीआयमध्ये शुल्क भरणा करू शकतो आणि चलान तपशील नंतर अद्ययावत करू शकतो. नंतर या चलान क्रमांकाची ऑनलाईन एसबीआय सेवेद्वारे पडताळणी केली जाते.

शुल्क भरणेनंतर उमेदवाराच्या अर्जासाठी एक युनिक ॲप्लिकेशन आयडी जारी केला जातो, हा उमेदवाराने जतन करणे आवश्यक आहे. ओटीपी (वन टाईम पासवर्ड), प्रवेशपत्र, पासवर्ड रिसेट अशा बाबींसाठीही यंत्रणा ई-मेल आणि एसएमएस सेवा उपलब्ध करून देते.

प्रवेशपत्र जारी करणे, उपस्थिती पत्रकात नोंद अशी उपयुक्त कामेही यंत्रणेमार्फत पूर्ण होत असल्यामुळे विभागीय प्रक्रिया जलद आणि कार्यक्षम होते

प्राप्त अर्ज:

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या 58 एककांच्या जाहिरातींसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 5 मे ते 25 मे 2014 या कालावधीत (20 दिवसांत) तब्बल 5,82,251 अर्ज प्राप्त झाले.
पुरूष उमेदवार : 5,11,540
महिला उमेदवार: 70,711

ॲम्ब्युलन्स इन्स्पेक्शन मॉनीटरींग सिस्टम

परिचय : आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी निर्धारित 937 रूग्णवाहिकांच्या निरीक्षणाच्या तपशिलाची नोंद करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील निरीक्षक या ॲप्लिकेशनचा वापर करतील.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क

परिचय: संगणकीय कामकाजाला प्राधान्य देत राज्य उत्पादन शुल्क विभाग विविध संबंधित प्रक्रियांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्सचा वापर करते.

प्राप्त पुरस्कार:

  • ई-प्रशासनाच्या अंमलबजावणीसाठी सीएसआर निहिलेंट पुरस्कार सोहळ्यात उत्पादन शुल्क विभागाला अवॉर्ड ऑफ रेकग्निशन प्राप्त
  • उत्पादन शुल्क विभागाच्या व्यापक परिवर्तनासाठी स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट 2013
  • महाएक्साईज, उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य यांना स्कॉच डिजीटल इन्क्लुजन स्मार्ट गव्हर्नंन्स पुरस्कार 2013
फ्री कोचिंग क्लासेस ॲन्ड अलाईड स्कीम्स

परिचय: या यंत्रणेमध्ये विद्यार्थ्याचा शैक्षणिक तपशील, स्पर्धा परीक्षेचा तपशील आणि विद्यार्थ्याला प्रशिक्षण प्राप्त करण्याच्या दृष्टीने पसंतीचे ठिकाण या बाबींचा समावेश असलेला अर्ज सादर केला जातो.
विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी विभागाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिला जातो.

प्राप्त पुरस्कार: स्पेशल मेंशन फॉर मंथन अवॉर्ड 2014

रिफ्रेश बटन:
छाननीनंतर एकूण प्राप्त गुण, नापास असलेल्या विषयांची संख्या, कौटुंबिक उत्पन्न अशा निकषांवर आधारित पात्रता यादी एका क्लिकवर प्रदर्शित होते. अखेर निवडलेल्या सर्व स्पर्धा अभ्यासक्रमांसाठी अर्ज जतन केला जातो.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचा अल्पसंख्याक धर्म लक्षात घेत आणि प्रत्येक स्पर्धा अभ्यासक्रमांसाठी मंजूर जागांच्या एकूण संख्येसह गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाते.

सर्व पात्रता आणि गुणवत्ता यादी अहवालांमुळे विभागीय प्रक्रिया जलद आणि कार्यक्षम होते.

प्राप्त अर्जांची संख्या : सर्व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या संदर्भात मोफत प्रशिक्षणासंबंधीचे सर्व अर्ज या ॲप्लिकेशनद्वारे स्वीकारले जातात. आतापर्यंत मोफत प्रशिक्षणासाठीचे एकूण 1163 ऑनलाईन अर्ज स्वीकारले गेले आहेत.

ऑनलाईन मायनॉरीटी स्टेटस सर्टीफिकेट ॲप्लीकेशन

परिचय: या यंत्रणेत अल्पसंख्याक दर्जा प्रमाणनासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या संस्थांची नोंदणी, संस्थांनी अपलोड केलेल्या तपशिलाची आणि कागदपत्रांची पडताळणी आणि पुढील छाननीसाठी अर्ज पुढे पाठविणे या प्रक्रियांचा समावेश आहे. विविध अहवालांद्वारे सक्षम प्राधिकारी या अर्ज प्रक्रियेवर देखरेख ठेवू शकतात.

प्राप्त पुरस्कार: स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट अवॉर्ड 2013

एकूण प्राप्त अर्ज: 
(आतापर्यंत)
  • एकूण नोंदणीकृत संस्थांची संख्या : 1186
  • एकूण प्राप्त अर्जांची संख्या: 438
  • एकूण मंजूर अर्जांची संख्या: 232
महाराष्ट्र स्टेट पी एस यु रिपोर्टींग सिस्टम

परिचय :
कंपनी तपशील, ताळेबंद, भांडवल अंदाजपत्रक, स्टाफिंग पॅटर्न, नफा आणि तोटा खाती, इतर संकीर्ण माहितीचे व्यवस्थापन
कंपनीने नोंद केलेला तपशील संबंधित विभाग मंजूर/नामंजूर करेल. वित्त विभाग अहवाल, डॅशबोर्ड, ताज्या घडामोडी, शासन निर्णय, परिपत्रके, पी एस यु समिती अहवाल, लेखापरीक्षण अहवाल पाहू शकेल. संबंधित विभागाने मंजूर केलेल्या माहितीची छाननी वित्त विभाग करेल. ही यंत्रणा पी एस युं च्या वित्तीय तपशीलाआधारे त्यांच्या कामगिरीचे तपशीलवार विश्लेषण करण्याच्या कामी वित्त विभागाला सहायक ठरेल.

प्राप्त अर्जांची संख्या
आतापर्यंत यंत्रणेमध्ये 239 नोंदी करण्यात आल्या आहेत.