महाऑनलाईन विषयी

"संगणक क्रांतीच्या माध्यमातून नागरिकांना देण्या सेवा
स्थापन होता महाऑनलाईन, जनसेवेशी जुळला दुवा"

महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस ही कंपनी (माहिती तंत्रज्ञान सेवा, बिझनेस सोल्यूशन्स तसेच आऊटसोर्सींग फर्म असणारी कंपनी) यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या महाऑनलाईनची स्थापना मार्च 2010 मध्ये झाली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटायझेशन आणि माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, या दृष्टीने महाऑनलाईन कार्यरत आहे. राज्यातील विविध शासकीय विभाग आणि नागरिकांना सुलभपणे घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याच्या कामी महाऑनलाईन प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

ऑनलाईन पध्दतीने सेवांचा लाभ

महाऑनलाईनने क्रांतिकारी पवित्रा घेत फेर-अभियांत्रिकीच्या प्रक्रियेमध्ये अनेक बदल घडवून आणले. सरकारी कार्यालयांच्या खिडक्यांसमोर मोठाल्या रांगा लावून सेवा प्राप्त करण्याची यंत्रणा मोडीत निघाली आणि या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्या. आजघडीला महाऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दररोज साधारण 75000 नागरिक ऑनलाईन सेवांचा लाभ घेत आहेत.

महाऑनलाईनच्या माध्यमातून 25 शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन सेवाभरती, ऑनलाईन लॉटरी, नॅशनल पार्कसाठी ऑनलाईन तिकीट या आणि अशा अनेक सुविधांचा सहजपणे लाभ घेणे नागरिकांना शक्य झाले आहे आणि त्यामुळे शासकीय कामकाजातील पारदर्शकता वाढली आहे.

विविध विभागांची संकेतस्थळे

महाऑनलाईन सर्व शासकीय विभागांना साधी सोपी संकेतस्थळे विकसित करण्यापासून गुंतागंतीची वेब ॲप्लिकेशन्स विकसित करण्यापर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारचे सहाय्य देऊ करते. सर्व विभाग आणि नागरी संस्थांना एसएमएस गेटवे आणि पेमेंट गेटवेच्या सुविधा महाऑनलाईननेच उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध विभागांसाठी जीआयएस आणि बीआय सेवा संबंधित प्रकल्पांवरही महाऑनलाईन काम करत आहे. तसेच ई-केवायसीचा वापर करत एम-गव्हर्नन्ससाठी उपयुक्त ठरतील, अशी मोबाईल ॲप्स विकसित करण्याचे कामही महाऑनलाईन करत आहे.

सीएसआर अर्थात कॉर्पोरेट - सामाजिक जबाबदारी

महाराष्ट्र राज्य शासन आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या महाऑनलाईन मर्यादित या निमशासकीय कंपनीने आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान नेहमीच बाळगले आहे. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडण्यासाठी कंपनीने त्यासंदर्भातील धोरणे आणि प्रक्रिया निर्धारित केल्या आहेत. या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून कंपनीने पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये रू. 27,55,824/- इतक्या रकमेचे योगदान दिले आहे.

सीएसआर धोरण डाउनलोड करा

संचालक मंडळ

मुख्य सचिव - महाराष्ट्र शासन
श्री. अजोय मेहता
अध्यक्ष
मुख्य सचिव - महाराष्ट्र शासन
प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान - महाराष्ट्र् शासन
श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास 
संचालक
प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान - महाराष्ट्र् शासन
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
श्री. तेज भाटला
संचालक
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
श्री.लक्ष्मीनारायणन शेषाद्री
संचालक
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
श्री. चैतन्य साठे
संचालक
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस